दिवाळी गर्दीला तोडगा: कोकणमार्गावर दोन स्पेशल गाड्यांची घोषणा

Rajesh Palshetkar
By -
0

दीपावलीच्या सुट्टीत कोकणमार्गावर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोमवारी दोन विशेष गाड्यांची घोषणा केली. यात मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) साप्ताहिक स्पेशल तसेच चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे. साप्ताहिक स्पेशलचे आरक्षण १ ऑक्टोबरपासून सुरू होईल.


मडगाव – एलटीटी दिवाळी साप्ताहिक स्पेशल (०१००३/०१००४)

  • ही गाडी ५, १२ व १९ ऑक्टोबर रोजी प्रत्येक रविवारी मडगावहून सुटेल.

  • मडगाव येथून दुपारी ४.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

  • परतीच्या प्रवासात, ही गाडी ६, १३ व २० ऑक्टोबर रोजी दर सोमवारी एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री १०.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

  • या गाडीला २० एलएचबी डबे जोडले जाणार असून ती करमाळी, थिवी, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे येथे थांबेल.

चिपळूण – पनवेल मेमू स्पेशल (०११५९/०११६०)

  • ही अनारक्षित मेमू स्पेशल गाडी ३ ऑक्टोबरपासून २६ ऑक्टोबरपर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावेल.

  • चिपळूण येथून सकाळी ११.०५ वाजता सुटून दुपारी ४.१० वाजता पनवेलला पोहोचेल.

  • परतीच्या प्रवासात, पनवेल येथून सायंकाळी ४.४० वाजता सुटून रात्री ११.५५ वाजता चिपळूणला पोहोचेल.

  • या आठ डब्यांच्या मेमू गाडीला आंजणी, खेड, कळंबनी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापेवामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे येथे थांबे मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!