पदांचा सविस्तर तपशील
| पदाचे नाव | गट | एकूण पदे |
|---|---|---|
| पशुधन विकास अधिकारी | गट ‘अ’ | २७९५ |
| सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन | गट ‘अ’ | ३०८ |
| एकूण पदे: | ३१०३ | |
परीक्षेचे वेळापत्रक आणि ठिकाण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (CBT) असेल.
- परीक्षेची तारीख: ११ जून २०२६
- वेळ: सायंकाळी ५:३० ते ७:००
- परीक्षा केंद्रे: मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर.
पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आनंद
"खूप दिवसांपासून आपण ज्या बातमीची प्रतीक्षा करत होतो, ती अखेर आली आहे. या भरतीमुळे पशुसंवर्धन विभागाच्या कामाला मोठा वेग मिळेल. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशुधनाची अधिक चांगली काळजी घेणे आता शक्य होईल. सर्व परीक्षार्थींना माझ्याकडून खूप शुभेच्छा!"
- पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री
या भरतीमुळे पशुवैद्यकीय आरोग्य तपासणी, लसीकरण आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यास मदत होणार आहे. परीक्षेतील गुणांच्या आधारे स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून पुढील निवड प्रक्रिया राबविली जाईल.

