आरजीपीपीएल म्हणजेच पूर्वीच्या एन्रॉन कंपनीमधील कामगारांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता अचानकपणे कामावरून कमी करण्यात आले. होते. त्या कामगारांनी सामंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी सामंत यांनी जिल्हाधिकार्यांना सूचना केल्या तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलवून घेतले. कंपनीच्या अधिकार्यांनी. या कामगारांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत दिलेल्या रोस्टरप्रमाणे रुजू व्हावे व डिसेंबर अखेरीस पूर्ववत कामावर समाविष्ट करून घेण्यात येईल असे सांगितले. तसेच कोकणच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला आरजीपीपीएल प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामंत यांना विनंती केली. दरम्यान, या सर्व प्रक्रियेमध्ये ' सिंधूरत्न योजेनेचे संचालक किरण (भैय्या) सामंत यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच संदेश कनगुटकर, मुन्ना देसाई,अमरदीप परचुरे आदी पदाधिकारी यांनी सहकार्य केले.
रत्नागिरी गॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार - पालकमंत्री
By -
नोव्हेंबर ०७, २०२३
0
गुहागर: तालुक्यातील रत्नागिरी गॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू व कामावरुन कमी केलेल्या कामगारांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पीडित कामगारांनी दिलेल्या भेटीप्रसंगी दिले.
Tags:

