खेडमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या दोघांस एक दिवस पोलीस कोठडी

Rajesh Palshetkar
By -
0
खेडः तालुक्यातील वेरळ फाट्यानजीक ८ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या गुटखा विक्री प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे  आदेश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षाच्या वतीने अँड. स्मिता कदम यांनी युक्तीवाद केला. 'पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सावंतवाडी येथून महाडच्या दिशेने टेम्पोतून गुटख्याची वाहतूक करणार्‍या प्रेमन शंकर मोकल (३५, रा. वाशीनाका), जगदीश हरिश्‍चंद्र मोरे (३५, कांबळेपाडा, पेण- रायगड) यांना शिताफीने जेरबंद केले. गुटखा वाहतुकीसाठी वापरलेला ९ लाख ख्पये किंमतीचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.

रायगड जिल्ह्यातून मुंबई गोवा महामार्गाने खेड कडे हे आरोपी येत होते. रात्रीच्या काळोखात ते गुटख्याचा माल पोच करुन निघणार होते. मात्र, पोलिस पथकाने खेडमध्ये दाखल होताच शनिवारी रात्री गुटख्याने भरलेली गाडी पकडली होती. या कारवाईत विमल पानमसाला व व्ही १ तंबाखू असा ८ लाख ८० हजार २०० रुपये किंमतीचा गुटखा सापडला आहे. हा प्रतिबंधीत माल विक्री करीता नेताना वाजताच्या सुमारास पकडल्याने गुन्हा रजिस्टर नंबर ३४०/२०२३ नुसार भादवि कलम ३२८,१८८,२७२,२७३,३४ व अन्न सुरक्षा अधिनियम २००६ चे कलम २६(१),२६(२) २६(२i), २६(२lv), २६(३d), २७(३९), ३०(२व३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुणगेकर मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने केली आहे.

 या प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. यात दापोली कनेक्शन संशय व्यक्‍त होत आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी गुटखा विक्री, वाहतूक किंवा कब्जा बाळगणे अशा अवैध प्रकारांवर कठोर कारवाई करून असले उदयोग मुळापासून नष्ट करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. अंमली पदार्थ विरोधी झिरो टॉलरन्स समूळ उच्चाटन करण्याची स्पष्ट भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक यांची असून त्या प्रमाणे कारवाई सुरूच राहील. - पो.निरीक्षक, भोयर

Tags:

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!