आज ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल त्या त्या तालुकास्तरावर दिला जाणार आहे. या निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मंडणगड तालुक्यातील उन्हवरे आणि वाल्मिकीनगर, दापोली तालुक्यातील डौली, मांदिवली, कवडोली आणि बांथतिवरे, आंजर्ले, चिपळूण तालुक्यातील कुले बु. वु स, टेरव, वालोपे, संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे आणि कळंबस्ते, राजापूरमधील मोसम ग्रा.पं. तर लांजातील इसवली/ पनोरे या १६ सार्वत्रिक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावर कडक नियोजन करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासन गुंतले आहे. सर्वच राजकीय शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (जबाठा गट) आणि भाजपा या तीन मातब्बर पक्षांनी वर्चस्व काबीज करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. जोरदार चुरस जिल्ह्यात अद्यापही नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदांच्या एकक जाहीर झालेल्या नाहीत. सत्तापालटानंतर ग्रामीण भागातील मतदारांमध्येही निवडणुकांसाठी उत्सुकता दिसून येत आहे. जिल्ह्यात वे. ग्रामपंचायत हिडणुसांग शिवसेना निदे गट व भाजपने आपला ठसा उमटवला होता. ठाकरे गट राष्ट्रवादीनेही चांगली बाजी मारली होती. आता तर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटामध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे, तर भाजपाकडूनही आपल्या वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी झालेली आहे. राष्ट्रवादी व इतर पक्षदेखील आपला ठसा उमटवण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. त्याचा प्रत्यय ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. ग्रामपंचायतींमध्ये सध्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांच्या द ताणा सर्वच पक्षांनी जय्यत केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रंगत येणार आहे. आज रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वा. पासून ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत, मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल घोषित होणार आहे.

