या लोकार्पण सोहळयास खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, माजी आमदार हुस्नबानू खलिपे आदी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर पोलीस बॅड पथकाने राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गात ध्वजाला सलामी दिली. यावेळी फुगे हवेत सोडण्यात आले. यानंतर 'कोनशिलेचे अनावरण ही पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले . रायगडमध्ये १३ ठिकाणी आणि रत्नागिरीत ९ ठिकाणी ७५ फूट उंचीचे ध्वज उभे करणारे राज्यातील हे पहिले दोन जिल्हे आहेत. यासाठी १ कोटी ३० लाख रुपये जिल्हा नियोजन मधून खर्च करण्यासाठी, विकासासाठी, देशासाठी पक्षीय विचार बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आले. त्यासाठी सर्व सदस्यांना धन्यवाद देतो. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी हा आदर्श आहे, असेही ते म्हणाले. 'जिल्ह्यात ९ ठिकाणी ७५ फूट उंच ध्वज उभा करणारा रत्नागिरी जिल्हा राज्यात पहिला असेल, असे आमदार राजन साळवी म्हणाले. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा आणि माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रांताधिकारी वैशाली माने यांनी, तर तहसीलदार शीतल जाधव यांनी आभार मानले.

