एसटीने केली १० टक्के भाडेवाढ

Rajesh Palshetkar
By -
0

मुंबई, ता. 04 : दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या काळात सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. महसूल वाढवण्याच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटी महामंडळाने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होईल. तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. एसटी ताफ्यातील १४ हजार बस प्रवासी सेवेत धावत आहेत. शिवनेरी, ई-शिवनेरी, शिवाई, अश्वमेध, परिवर्तन (लालपरी), हिरकणी, शितल, विना वातानुकूलित शयनयान, विना वातानुकूलित आसनी व शयनयान अशा सर्व बसश्रेणींसाठी भाडेवाढीनूसार तिकीट आकारण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!