पिस्तूलसह ४६ राऊंड बाळगणाऱ्या परप्रांतीयावर चिपळूण पोलीसांची कारवाई

Rajesh Palshetkar
By -
0
मुंबई-गोवा महामार्गावरच्या वालोपे परिसरातील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणार्‍या एका परप्रांतीय तरुणाकडे चिपळूण पोलिसांनी सापळा रचून गावठी बनावटीचे पिस्तूल, २ फायटर हत्त्यारे आणि तब्बल ४६ राऊंड असा मुद्देमाल जप्त केल्याची घटना बुवारी पडली. 
या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या बाबत पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे. 'निरजसिंह हिरा बिस्त (२१, उत्तराखंड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाकडे विनापरवाना पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तो रहात असलेल्या वालोपे येथील माऊली अपार्टमेंट ठिकाणी सापळा रचला. संबंधिताला किंवा त्याच्याबरोबर राहणाऱ्याला या बाबतचा सुगावा लागू नये, याची पोलिसांनी सुरक्षेच्यादृष्टीने खबरदारी घेतली होती. जीवाची बाजी लावून ही कारवाई करत असताना विस्त याने सदनिकेचा दरवाजा उघडताच त्याच क्षणी त्याच्यावर झडप घालण्यात आली. यावेळी त्याच्या 'सदनिकेची तपासणी केली असता त्यात गावठी बनावटीचे पिस्तून, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड असा मुद्देमाल आढळून आला. त्याच्याकडे दोन मोबाईल आढळून आले आहेत. या प्रकरणी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे, संजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरुण जाथव, पंकज खोपडे, पूजा चव्हाण, हेडकॉन्स्टेबल पाटील.शेटकर, कृष्णा दराडे, प्रमोद कदम आदींच्या पथकाने केली. बिस्तने हे पिस्तूल कोणाकडून घेतले, यामागे त्याचा उद्देश काय होता, असे प्रश्‍न पोलीस तपासातून पुढे येणार: आहेत,

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!