मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या कामात जोरदार ब्लास्टींग; दाभोळे येथे भूसुरंगाचे काम रोखले

Rajesh Palshetkar
By -
0

संगमेश्वरः तालुक्‍यातील दाभोळे मालपवाडी येथे मिऱ्या - नागपूरमहामार्गाच्या कामानिमित्त भूसुरुंग लावण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे आणि ८ ते १० फुटाचे भूसुरुंग लावण्यात येत. आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांना व आरोग्य यांना धोका होऊ शकतो, त्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी हे भूसुरुगांचे काम शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते बापू शिंदे यांनी सोमवारी रोखले. 

या भूसुरुंगाच्या स्पोटामुळे येथील घरांस ग्रामपंचायतीची नळपाणी पुरवठा योजनेची पाण्याची टाकी आहे. त्याला तडे जाऊन नुकसानी होण्याची शक्यता आहे. तसेच आजूबाजूच्या शेतजमिनींना भविष्यात भेगा पडून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे व जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व ठाकरे गटाचे साखरपा येथील युवा नेते बापू शिंदे यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची दखल घेत बापू. शिंदे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर संबंधित कंपनीच्या कर्मचार्‍यांना जाब विचारला. या भूसुखंग स्फोटामुळे ग्रामस्थांचे नुकसान होऊन जीवितहानीही होऊ शकते. या रस्त्याचे काम तर झालेच पाहिजे, परंतु कोणतेही नुकसान न होता कंत्राटदार कंपनीने काम करणे अपेक्षित आहे. या प्रकरणी महसूल विभाग यांनी त्वरित लक्ष घालून संबंधित कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी तहसीलदार अमृता' साबळे यांच्याकडे केली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. महामार्गाचे काम करताना काळा दगड मशीनद्वारे अथवा सौम्य सुरुंगानी फोडण्यात यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. यावेळी मुन्ना महाडिक, जयवंत पाटील व मालपवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!