चिपळूणात नैराश्यातून तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

Rajesh Palshetkar
By -
0

चिपळूण : नैराश्यातून एका २६ वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

अक्षय संभाजी मोहिते (२६, काने-पिंपळी) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. याची खबर अजय डोके यांनी दिली. अक्षयचे त्याच्या पत्नीसोबत वाद होते. तसेच अक्षयला दारुचे व्यसन होते.यातूनच त्याला नैराश्य आले होते. असे असतानाच मंगळवारी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तुतारी एक्सेस रेल्वेगाडीखाली त्याने खेर्डी परिसरात आत्महत्या केली. या घटनेची माहिती चिपळूण पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी गेले. अक्षयच्या धडाचे दोन भाग झाल्याने एक भाग पोलिसांना सापडला होता तर उर्वरित भाग न सापडल्याने सकाळी पोलिसांनी तेथे जंगलमय परिसरात शोध घेतल्यानंतर तो सापडला

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!