या
प्रकरणी त्यांनी रत्नागिरी शहर
पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणी
अनंत गजानन शिंदे
याच्याविरूद्ध शासकीय कामात
अडथळा करून मारहाण
केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
केला. पोलिसांनी दिलेल्या
माहिती प्रमाणे, स्वीकिरण टेळे हे
युको बँक येथे काम
करतात. संशयित आरोपी
अनंत शिंदे यांना बँकेने एका
कर्जप्रकरणासंबंथी नोटीस
धाडली होती. या बँकेची
नोटीस आलेली समजताच
अनंत शिंदे यांच्या रागाचा
पारा चढला. याचा जाब
विचारण्यासाठी ३ ऑक्टोबर
२०२३ रोजी दुपारी २ः३०
वाजण्याच्या सुमारास अनंत
शिंदे हे थेट युको बँकेच्या
शाखेत धडकले.
बँकेत प्रवेश करताच अनंत
शिंदे यांनी बँकेचे कामकाज
सुरू असताना 'मला नोटीस
कशी काय पाठवली. तुम्हांला
काय अधिकार आहे, नोटीस
पाठवण्याचा', असे बोलून शिंदे
यांनी गोंधळ घालत
कर्मचार्यांना शिवीगाळ
करण्यास सुरूवात केली.
तसेच रागाच्या भरात शिंदे हे
बॅंकेतून बाहेर पडले.
या शिंदे यांच्या
मनात बँकेने आपल्याला
नोटीस पाठवल्याचा राग
मनामध्ये धुमसत
होता. याच
रागातून शिंदे
यांनी पुन्हा बँक
कर्मचाऱ्याला धडा
शिकवण्याचा निर्णय घेतला.
सायंकाळी ६ः४५ च्या
युको बँक कर्मचारी
टेळे हे बँकेतून घरी
जात होते. टेळे हे गाडी
चालवत नवलाई मंदिर नाचणे
येथे आले असता अनंत शिंदे
यांनी आपली गाडी टेळे
यांच्या गाडीसमोर लावली. टेळे
यांना काही समजायच्या
आतच अनंत शिंदे यांनी
रवीकिरण टेळे यांच्या
कानशिलात लगावली. तसेच
“पुन्हा माझ्या वाटेत याल तर
लक्षात ठेवा, अशी धमकी
दिली, अशी तक्रार टेळे यांनी
रत्नागिरी शहर पोलिसात
दाखल केली. पोलिसांनी या
प्रकरणी अनंत शिंदे
याच्याविरूद्ध भादंवि कलम
३५३, ३३२, ३२३, ३४५१,
५०४, ५०६ नुसार गुन्हा
दाखल केला. या प्रकरणी
पुढील तपास रत्नागिरी शहर
पोलिसाकडून करण्यात येत
आहे.
कर्जाची नोटीस पाठविल्याने बॅंक कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली
By -
नोव्हेंबर ०६, २०२३
0
रत्नागिरी: कर्जप्रकरणासंबंधी नोटीस
पाठवल्याच्या रागातून बँक
कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत
कानशिलात लगावली. ही
घटना शुक्रवारी युको बँक
रत्नागिरी ते नवलाई मंदिर,
नाचणेदरम्यान घडली. रवीकिरण
बालासाहेब टेळे असे युको
बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे.
Tags:

