'दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत

Rajesh Palshetkar
By -
0

 


मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल व्यवहारांमधील वाढती फसवणूक, डीपफेक तंत्रज्ञान आणि ऑनलाइन सुरक्षितता या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर या मुलाखतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत दि. 18 ते 23 मे 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता गरुडे यांनी केले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि AI च्या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक क्लिष्ट आणि धोकादायक बनत आहे. डिजिटल अरेस्ट, फिशिंग, बनावट कॉल्स, सोशल मीडियावरील फसवणूक, व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक व्हिडिओ, AI-generated phishing यांसारख्या नव्या प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे या मुलाखतीत अधोरेखित करण्यात आले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीन मुलांवरील सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, वैयक्तिक माहितीची चोरी, गोपनीयतेचा भंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांच्या तपासातील आव्हाने याविषयीही या मुलाखतीत सखोल माहिती देण्यात आली आहे.

नागरिकांनी सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी आणि कुठे नोंदवावी, तसेच तक्रार नोंदविताना कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्य व केंद्र शासनाकडून सायबर सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, AI-आधारित सुरक्षा प्रणालींचा बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि शासकीय यंत्रणांमधील वापर, तसेच भविष्यातील सायबर सुरक्षेची दिशा यावरही या मुलाखतीत चर्चा करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!