पुणे महानगरपालिका भरती फसवणूक प्रकरणाची सखोल चौकशी करणार

Editorial Team
By -
0

मुंबई, दि. 29 : पुणे महानगरपालिकेत  खोट्या नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा प्रकारच्या टोळ्या राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत आहेत का, याचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत दिली.


सदस्य सत्यजित तांबे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

राज्यमंत्री कदम म्हणाले की, या प्रकरणातील विविध तक्रारींची पोलिसांकडून तपासणी सुरू असून संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही तक्रारदारांनी रक्कम परत मिळाल्यानंतर तक्रारी मागे घेतल्या असल्या, तरी वारंवार समोर येणाऱ्या संबंधित व्यक्तीची सुमोटो चौकशी करण्यात येणार आहे.

खोटी अनुभव प्रमाणपत्रे व बनावट कागदपत्रे तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांबाबतही माहिती मिळाल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात अशा प्रकारचे रॅकेट कार्यरत नाही ना, याचीही खातरजमा करण्यात येईल.

तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवण्याची सुविधा उपलब्ध असून पोलीस विभागाच्या हेल्पलाइनवर नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहनही राज्यमंत्री कदम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!